जळगाव (प्रतिनिधी) विनापरवाना वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून न जाता परस्पर पळवून नेल्याप्रकरणी ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावखेडा बुद्रुक गावानजीक गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतुक करणारे ट्रॉलीसह ट्रॅक्टर तलाठी रविंद्र श्रीरंग घुले (सजा धामणगाव) यांना आढळून आले. या ट्रॅक्टर – ट्रॉलीचा पंचनामा झाल्यानंतर चालक नितीन किसन कुंभार (मयुर कॉलनी पिंप्राळा) यास त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात घेवून जाण्यास तलाठी रविंद्र घुगे यांनी सांगितले. परंतू ट्रॅक्टर चालक नितीन कुंभार याने ते ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याऐवजी परस्पर पळवून नेले. आपल्या वाहनाची चावी देखील कुंभार याने काढून घेतल्याचा आरोप तलाठी घुले यांनी केला आहे. ट्रॅक्टर चालक नितीन कुंभार व मालक फैजल खान अस्लम खान या दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस स्टेशनला तिन हजार रुपये किमतीच्या वाळू चोरीसह महसुल कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हे.कॉ. प्रविण पाटील करत आहेत.