अमळनेर (प्रतिनिधी) येथील नऊ वर्षाचा तनय रितेश चौधरी हा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा मानकरी ठरला आहे. शिवगंगा रोलर स्केटिंग संघाने फास्टेस्ट १०० मीटर इनलाईन स्केटिंग ११.२१ सेकंदात पूर्ण केली आहे. हा जागतिक विक्रम ठरला आहे.
शिवगंगा रोलर स्केटिंग क्लबतर्फे ३० मेस कर्नाटकातील बेळगावमध्ये आयोजित स्पर्धेत बदलापूरच्या इंडियन स्कूल ऑफ स्केटिंगतर्फे सहभाग घेतला होता. स्केटिंग रिले स्पर्धेत ३७० स्पर्धकांचे १२ ग्रुप बनविण्यात आले होते. सलग ४८ तासांची स्केटिंग रिले स्पर्धा आयोजित केली होती.
त्यात फास्टेस्ट १०० मीटर इनलाईन स्केटिंग ११.२१ सेकंदात पूर्ण करण्यात आली. ज्या संघाने ही कामगिरी केली. त्या संघात अमळनेर येथील एलआयसी कॉलनीतील रहिवासी तनय चौधरी देखील सहभागी होता. त्यामुळे विक्रमात त्याचीही नोंद झाली आहे. त्याला मनीषा गावकर , अथर्व गावकर यांचे मार्गदर्शन लाभले. तनय हा गोविंद चौधरी व आशालता चौधरी या सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्याचा नातू आहे. शिक्षक संघटनेचे मधुकर चौधरी, नगरसेवक विवेक पाटील, दीपक चव्हाण, अशोक मोरे, कैलास बोरसे, अनिल धनुरे व इतरांनी तनयचे कौतुक केले आहे.