जळगाव (प्रतिनिधी) पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्याने माधूरी समाधान सपकाळे (वय ३५) या महिलेसह मुलावर प्राणघातक हल्ला करुन संशयित पसार झाला होता. संशयित हल्लेखोर समाधान उर्फ उत्तम सपकाळे हा मुंबईला पळून जाण्यापुर्वीच एमआडीसी पोलिसांनी सापळा रचून संशयिताच्या धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथून मुसक्या आवळल्या.
शहरालगत असलेल्या खेडी गावात माधुरी समाधान सपकाळे (वय-३५) या मुलगा ऋषभ, व लहान मुलगा विकी याच्यासह वास्तव्यास आहे. त्यांचे पती समाधान सपकाळे ऊर्फ उत्तम याच्या व्यसनाधिनतेला कंटाळून विवाहिता या दोघ मुलांचा संभाळ करण्यासाठी खेडी येथे नातेवाईकाकडे स्वंतत्र राहत होत्या अशातच दि. ७ नोहेंबर रोजी मध्यरात्री पती समाधान सपकाळे त्यांच्या घरी आला आणि पत्नीला सोबत येण्यासाठी तगादा लावित होता. मात्र पत्नीने नकार दिल्याने त्यांच्या वाद होवून कडाक्याचे भांडण झाले. समाधान सपकाळे याने माधुरी यांच्या डोक्यात हातापार्यांवर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. आईला मारहाण होत असल्याने मुलाने बचावाचा प्रयत्न केल्याने त्याच्यावरही हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात माधुरी यांना गंभीर दुखापती होवुन तब्बल ९२ टाक्यांची शस्त्रक्रिया करुन त्यांचा जीव वाचविला.
हल्ल्यात पत्नी माधुरीचा मृत्यू झाल्याचे समजुन समाधान सपकाळे उर्फ उत्तम याने तिला सोडून पळ काढला. घटनेच्या दिवसा पासुन समाधान हा पोलिसांना गुंगारा देत होता. शुक्रवारी तो एरंडोल येथून मुंबई जाण्यासाठी निघाल्याची माहितीपोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांना मिळाली होती. मुसळी फाट्याजवळून आवळल्या मुसक्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील उपनिरीक्षक शरद बागल, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे, नितीन ठाकुर, नरेंद्र मोरे यांच्या पथकाने संशयीताचा माग काढत धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्या जवळ शेतातून ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केल्यावर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.