TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : अपहरण करुन बाळाची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !

अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरले बाळ, बाळ पालकांच्या स्वाधीन !

vijay waghmare by vijay waghmare
April 30, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलांसह सराईत गुन्हेगारांच्या मदतीने भुसावळातील साकेगाव येथून झोक्यातून आठ महिन्यांच्या चिमुकल्याल पळवून नेत त्याची मुंबई येथे ३ लाख ८० हजारात विकले. या गुन्ह्याचा तपास असतांना पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या प्रेयसीने ते बाळ अनाथ आश्रमात आणून ठेवले, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या घटनेचा पर्दाफाश केला असून पोलिसांनी महिलेसह पाच जणांना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णकांत पिंगळे उपस्थित होते.

साकेगाव येथून मध्यरात्री चोरले बाळाला !
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील एका घरातून २३ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास झोक्यात झोपलेल्या आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण केले होते. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ तालुका पोलिसांकडून केला जात होता. पोलिसांचे वेगवेगळ पथक तयार करुन या गुन्ह्याचा चारही बाजूने तपास करीत होते. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे भुसावळ शहरातील नारायण नगरातील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन ट्रस्टतर्फे चालविल्या जाणाऱ्या अनाथ आश्रमावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये अपहरण झालेले आठ महिन्याचे बाळ मिळून आल्यानंतर पोलिसांनी ते बाळ ताब्यात घेत त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले.

READ ALSO

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

कुणकुण लागाताच आश्रमात आणून ठेवले
बाळ आठ महिन्याच्या बाळाच्या अपहरणाचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात होता. पोलीस आपल्या मागावर असल्याची कणकण लागताच अपहरणकत्या महिलेने मुंबईत विकलेले बाळ पुन्हा भुसावळात आणूने ते अनाथ आश्रमात ठेवले. मात्र तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर पोलिसांनी या घटनेचा पर्दाफाश केल्यानंतर या संपुर्ण घटनेचे बिंग फुटले.
अनाथ आश्रमाची दोन वर्षापुर्वीच वर्षापूर्वीच नोंदण
नोंदणी अपहरण केलेले बाळ आढळून आलेल्या अनाथाश्रमाची धर्मादाय आयुक्तांकडे २०२२ मध्ये नोंदणी केली. आहे. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या विषयी धर्मादाय आयुक्तांना या प्रकरणाविषयी महिती देण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या पथकाची कारवाई ही कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णकांत पिंगळे, वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल पाटील सहाय्यक फौजदार विठ्ठल फुसे, पोहेकॉ युनूस शेख, प्रेमचंद सपकाळे, वाल्मिक सोनवणे, दिलीप जाधव, संजय भोई, संजय तायडे, पोलिस नाईक नितीन चौधरी, जगदीश भोई, राहुल महाजन, सहाय्यक फौजदार सादीक शेख, पोहेकॉ उमाकांत पाटील, रमन सुरळकर, योगेश माळी, प्रशांत परदेशी, योगेश माळी, अमर आढाळे, राहुल भोई, पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे यांनी कारवाई केली आहे.

पोलीसाच्या मदतीने 3 लाख ८० हजार केली बाळाची विक्री
मुंबई येथील महिलेला आपत्य दत्तक घ्यायचे असल्याने तीने अनाथ आश्रमाची प्रमुख असलेली रिना कदम हीच्यासोबत संपर्क साधला, त्या महिलेने बाळाच्या मोबदल्यात रिना कदम हीला पैसे देखील देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार मुख्य सूत्रधार असलेल्या कदम हीने दोन अल्पवयीन मुलांसह इतर साथीदारांच्या मदतीने साकेगावातून आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण केले. त्यानंतर नंदुरबार पोलिस दलातील बाळू इंगळे याच्या मदतीने ते बाळ मुंबई येथे संबंधित महिलेकडे सुपुर्द करण्यात आले. त्यापोटी रीना कदम हिने सुमारे ३ लाख ८० हजार रुपये देखील घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

मुख्यसूत्रधार महिलेसह पाच जणांना अटक तर एक फरार
या घटनेत मुख्य सूत्रधार अनाथ आश्रम चालविणारी महिला, रिना राजेंद्र कदम (४८, रा. नारायण नगर, भुसावळ) ही आहे. तिच्यासोबत या गुन्ह्यात पोलिसांनी दीपक रमेश परदेशी (वय ३२, रा. नारायण नगर, भुसावळ), अमीत नारायण परिहार (वय ३०, रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ), कुणाल बाळू वाघ (वय १९, रा. साकेगाव, ता. भुसावळ), बाळू पांडूरंग इंगळे (वय ५१, रा. वरणगाव, ता. भुसावळ) या पाच जणांना अटक करण्यात आले आहे. या शिवाय अजून एका जणाचा शोध सुरू असून दोन अल्पवयीन मुलांचाही यात समावेश असल्याचे समोर आले आहे.

अपहरणात नंदूरबार येथील पोलिसाचा समावेश !
बाळाचे अपहरण केल्यानंतर त्या बाळाला मुंबई येथे घेवून जातांना रिना कदम हिच्यासोबत नंदूरबार पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागातील पोलीस हवालदार बाळू इंगळे सोबत होता. पोलिसांनी त्याला देखील अटक केली असून त्याचा अहवाल नंदूरबार पोलीस अधीक्षकांकडे पाठविला जाणार आहे. तसेच अटकेत असलेले अन्य संशयितांवर खून, खंडणी, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, आर्म अॅक्ट व इतर प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: CrimeSakegaon

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
जळगाव

खरीप हंगाम २०२६: जळगाव जिल्ह्यात युरीया खतांची पहिली रेक दाखल

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
गुन्हे

पाचोरा येथे चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 8, 2026
Next Post

जळगाव : कोम्बिंग ऑपरेशनमध्ये हद्दपारसह स्टॅण्डींग वॉरंटमधील संशयित ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल : लॉटरीचे आमीष दाखवून महिलेला घातला ३ लाख ८० हजाराचा गंडा !

July 3, 2022

समाजमन सुन्न ! जळगावात अवघ्या तेरा वर्षाच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या !

February 17, 2021

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळा ; धरणगावातील नागरिकांना महाविकास आघाडीतर्फे आवाहन !

October 10, 2021

धरणगावातील विविध कामे बोगस आणि नियमबाह्य, बिलं काढू नका ; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी !

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group