जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गांधी मार्केट परिसरातील चहाच्या टपरीत ठेवलेल्या बॅगमधील १ लाख ७५ हजार रुपये चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.
यासंदर्भात भिका गवळी (वय ३९ रा. शनिपेठ दालफळ गवळीवाडा जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १ जून २०२२ रोजी संध्याकाळी ६.३० ते ६.४५ वाजेच्या सुमारास गवळी यांच्या चहाच्या टपरी ठेवलेल्या बॅगमधील १ लाख ७५ हजाराची बॅग चार अज्ञात मुलांपैकी एकाने चोरून नेली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. योगेश बोरसे हे करीत आहेत.
















