TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावातील व्यापाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट, व्यवसाय परवाना कर रद्द करूनच राहणार!

vijay waghmare by vijay waghmare
August 23, 2025
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, दि.२२ ऑगस्ट २०२५ – जळगाव महानगरपालिकेने लागू केलेल्या व्यवसाय परवाना कराच्या निर्णयाला शहरातील व्यापाऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. मनपाचा हा निर्णय रद्द करण्यासाठी आज जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ आणि व्यापाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. ना.पाटील याबाबत अधिक माहिती घेत सोमवारी मनपा आयुक्तांना बोलावून चर्चा करणार असल्याचे सांगितले.

मनपाने प्रत्येक व्यवसायधारकाकडून वर्षाकाठी २०० ते २५,००० रुपये परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात ४-५ मनपा वगळता कुठेही हा कर लागू नाही. ड वर्ग महापालिका असलेल्या जळगावात व्यापाऱ्यांना सोय सुविधा न देता घेतलेला हा अवाजवी निर्णय चुकीचा आणि अन्यायकारक असल्याचे व्यापारी महामंडळाने म्हटले आहे. तसेच हा निर्णय लागू न करण्यासाठी यापूर्वी शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींकडे देखील पाठपुरावा करण्यात आला होता.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा
व्यवसाय परवाना कर निर्णय रद्द करण्याचा लढा तीव्र करण्यासाठी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी बैठक घेतली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे आज महामंडळ पदाधिकारी आणि व्यापारी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. यापूर्वी पालकमंत्री यांना याबाबत अवगत केले असल्याने त्यांनी महाराष्ट्रातील इतर मनपाची माहिती घेतली होती. त्यात जळगावात लावण्यात आलेला करबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

व्यापाऱ्यांनी मांडले मुद्दे
महाराष्ट्रातील मेट्रो शहरांमध्ये परवाना शुल्क आकारले जाते, परंतु तिथे मनपा सुविधा पुरवते. जळगावात मात्र स्वच्छता, शिक्षण, वृक्ष कर यांसारखे अनेक कर आकारले जातात, परंतु कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. शासनाने काही वर्षांपूर्वी शॉप अॅक्ट बंद केला. नोंदणी प्रक्रिया सुलभ केली. प्रमुख कर हटवून जीएसटी लागू केला. ऑनलाईन बाजारपेठमुळे स्थानिक व्यापारी अगोदर अडचणीत आहे. बाजारातील मंदी, जागतिक मंदीचे सावट यामुळे देखील व्यापाऱ्यांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे व्यापाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सांगितले.

आयुक्तांना सोमवारी चर्चेसाठी बोलावले
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यापाऱ्यांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या असून याबाबत अधिक आणि सविस्तर चर्चा करण्यासाठी मनपा आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली. तसेच त्यांना सोमवारी पुन्हा भेटीसाठी बोलावले आहे. मनपाने लागू केलेला हा व्यवसाय परवाना कर रद्द न केल्यास व्यापारी आपला लढा अधिक तीव्र करणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.

चर्चेसाठी यांची होती उपस्थिती
आज निवेदन देताना जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, उपाध्यक्ष युसूफ मकरा, उपाध्यक्ष प्रवीण पगारिया, संचालक रामजी सूर्यवंशी, सुभाष कासट, कैलास कासार, व्यापारी अनिल कांकरिया, मुर्तुझा शाकीर, धर्मेंद्र जैन, अनिल अग्रवाल, श्रीचंद अडवाणी, शांतीलाल नावरकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि व्यापारी उपस्थित होते.

मा.संपादक सो,
कृपया वरील वृत्तास आपल्या लोकप्रिय दैनिक, चॅनल, पोर्टलद्वारे प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
जळगाव

प्रगतिशील महाराष्ट्र-‘२०२६ प्रदर्शनात महावितरणच्या स्टॉलचा गौरव

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

वृद्ध दांपत्याचे बंद घर फोडले; सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांची धरणगाव ग्रामीण रुग्णालयाला भेट ; परिस्थितीचा घेतला आढावा !

April 3, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 20 मार्च 2024 !

March 20, 2024

खळबळजनक : बकऱ्या चारणाऱ्या दोन बालिकांवर अत्याचार ; तिघांना अटक !

June 14, 2023

भारतीय जैन संघटनेच्या वतीने आदिवासी मुलींना कपडे वाटप !

November 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group