जळगाव (प्रतिनिधी) राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत शहरातील तुकारामवाडी परिसरातील ३२ तरुणांनी नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सध्याची असलेली राजकीय भूमिका व राजसाहेब ठाकरे यांचे सडेतोड विचार यामुळेच आम्ही भारावलो गेलो असून भविष्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत आणखी काही तरुणांना आणण्याचा प्रयत्न करू असा संकल्प तरुणांनी केला.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष, किरण तळेले, उपमहा नगर अध्यक्ष ललित शर्मा, सतीश सैंदाणे, शहर सचिव महेंद्र सपकाळे, विभाग अध्यक्ष दुर्गेश पन्हाळे उपस्थित होते. प्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये पवन सपकाळे, गणेश क्षीरसागर, पियुष भालेराव, चैतन्य भालेराव, कुणाल कोळी, सूर्यकांत धनगर, भूषण पाटील, प्रणव ठाकूर, अखिल बहारे, पियुष धनगर, दुर्गेश परदेशी, राज राजपूत, शुभम चौधरी, दिवेश ठाकूर, गोरख राजपूत, पियुष ठाकूर, अमन बाविस्कर, गजानन शिरसागर, किरण गोसावी, निखिल पाटील, हर्षल हिरे, गोपाल पाटील, वैभव पाटील, प्रवीण शिंदे, राहुल चव्हाण, सागर अंदुरे, रोहन पाटील, राजकिरण राजपूत, हेमंत पाटील, शुभम देवरे, कल्पेश परदेशी, यांचा समावेश आहे. तर तरुणांच्या प्रवेशाचे नियोजन शहर सचिव महेंद्र सपकाळे व जयेश चौधरी चेतन पवार यांनी केले.