जळगाव (प्रतिनिधी) जळगाव – भुसावळ महामार्गावर गुरुवारी पहाटे तीन वाजता भरधाव कार पलटी होऊन अभीजित सुभाष पसारे (वय ३०, रा.डोंबिवली, मुळ रा.इंद्रप्रस्थ नगर, जळगाव) व पवन नंदू बागुल (वय २८,रा.मानपाडा) हे दोघं तरुण ठार झाले. महामार्गावरील तरसोद फाट्याजवळ कार घसरुन कलंडल्यामुळे आज गुरुवारी पहाटे हा अपघात झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजित पसारे हा तरुण खाजगी कंपनीत नोकरीला आहे. पावन बागुल हा देखील नोकरीला आहे. अभिजित पसारे यांचे साखरपुडा भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे झाला होता. अभिजित यांचे होणारे हे सासरे हे आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले होते. त्यांना पाहण्यासाठी भावी पत्नी व सासू हे मुंबईला बघण्यासाठी आलेल्या होत्या. दरम्यान अभिजित पसारे यांनी भावी पत्नी व सासूला सोडण्यासाठी भाड्याची कार करून ७ जुलै रोजी सायंकाळी साकेगाव येथे सोडण्यासाठी मित्र पवन बागुल सोबत आले होते.
दरम्यान, आज सकाळी अभिजित आणि पवन हे दोघे मुंबईकडे जाण्यासाठी निघाले. सकाळी नशिराबाद गावाजवळ ३ वाजेच्या सुमारास फोरवे ने जात असतांना सरस्वती फोर्डजवळ अचानक सिंगल रस्ता लागल्याने भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या बाजूला आदळून १०० मीटरपर्यंत उलट्या घेतल्या. यात अभिजित पसारे हा तरूण जागीच ठार झाला तर पवन बागुल गंभीर जखमी झाला होता. जखमी पवनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान पवनचाही मृत्यू झाला. मृत पवन याच्या पश्चात पश्चात आई मनिषा, पत्नी जयश्री असा परिवार आहे. तर मृत अभिजीत याच्या पश्चात आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.