TheClearNews.Com
Wednesday, April 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सरकारी पक्षाचा युक्तीवाद पूर्ण ; जामीन अर्जाला जोरदार विरोध !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 9, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, यासाठी अॅड. प्रवीण चव्हाण यांचा सुरू असलेला जोरदार युक्तिवाद आज पूर्ण झालाय. सोमवारी यावर ते अंतिम म्हणणे सादर करण्याची शक्यता आहे. सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आरोपांच्या जामिनाला जोरदार विरोध केला आहे.

अॅड. प्रवीण चव्हाण यांनी संशयित आरोपींच्या जामीन अर्जाला कालपासून युक्तिवादद्वारे विरोध करायला सुरुवात केली आहे. अॅड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर अनेक गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या होत्या. तसेच पुरावे म्हणून अॅड. चव्हाण यांनी कालप्रमाणे आज देखील अनेक पुरावे न्यायालयासमोर ठेवले.

READ ALSO

जळगाव जिल्ह्यासह राज्यात उष्माघाताने नागरिक दगावत आहेत; उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन १० लाखांच्या मदतीसाठी आ.खडसेंचा पाठपुरावा

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

दरम्यान, सोमवारी ५ संशयितांच्या वकिलांनी जामीनासाठी आपली बाजू न्यायालयासमोर मांडली होती. तर याआधी २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या वकिलांनी आपले म्हणणे कोर्टासमोर सादर केलेले आहे. बीएचआर मधील साधारण १२०० कोटीच्या घोटाळा प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २०२० आणि २०२१ अशा दोन वेळी राज्यात छापेमारी करून बीएचआर घोटाळ्यातील संशयितांना अटक केली आहे.

यातील १७ जून रोजी अटक केलेल्या ११ पैकी अंबादास बाबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोकटा, भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (जामनेर), जयश्री मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), राजेश लोढा (जामनेर) या संशयितांनी जामिन अर्ज दाखल केले होते. तर यापैकी जयश्री तोतला आणि जयश्री मणियार या दोघांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने २५ जून आधीच फेटाळून लावलेला आहे.

त्यानंतर २ जुलै रोजी जयश्री तोतला, जयश्री मणियार आणि भागवत भंगाळे या तिघांच्या जामीन अर्जावर सुनवाईच्या वेळी आपली बाजू मांडली आहे. तर ५ जुलैला छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, प्रितेश चंपालाल जैन, प्रेम नारायण कोकटा, राजेश लोढा या उर्वरित संशयितांच्या वतीने अॅड. सुधीर शहा आणि एस.पी. जैन यांनी युक्तिवाद केला होता. ६ जुलैला सुजित वाणी, संजय तोतला आणि अंबादास बाबाजी मानकापे या तिघांच्या वकिलांनी आज जामीन अर्जावर आपली बाजू मांडली. दरम्यान, आज (गुरुवार) पासून सरकार पक्षाने युक्तिवाद सादर करायला सुरुवात केली आहे. आज अपूर्ण राहिलेला युक्तिवाद सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण उद्या (शुक्रवार) रोजी पूर्ण करण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात या सर्व जामीन अर्जावर कामकाज सुरु आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्ह्यासह राज्यात उष्माघाताने नागरिक दगावत आहेत; उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन १० लाखांच्या मदतीसाठी आ.खडसेंचा पाठपुरावा

April 21, 2026
चाळीसगाव

रावळगाव साखर कारखाना उस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत देयकांबाबत आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत मालेगाव येथे बैठक संपन्न

April 21, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
गुन्हे

बोरनार येथे जून्या वादातून तरुणावर धारदार चाकूने हल्ला

April 20, 2026
गुन्हे

पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून आठ जणांकडून महिलेला मारहाण

April 20, 2026
क्रीडा

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल…

April 19, 2026
Next Post

भाजपाच्या पुच्छप्रगतीला फडणवीसांचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत ठरला : अनिल गोटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे ३ कोरोनाबाधित, ९ झाले बरे !

July 24, 2021

पाचोरा तालुका हादरला : मायलेकाने केला पित्याचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

July 23, 2024

करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात ; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद !

May 2, 2024

जळगावातून बंगाली कारागीरने लांबविले १७ लाखांचे सोने !

March 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group