जळगाव (प्रतिनिधी) नाशिक पोलीस परिक्षेत्र अंतर्गत विभागीय पोलीस क्रीडा स्पर्धेअंतर्गत आज शेवटच्या दिवशी जळगाव विरुद्ध नाशिक शहर फुटबॉल सामना चांगलाच चुरशीचा ठरला. जळगाव संघाच्या खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन केल्याने विरोधी संघाला खाते देखील उघडता आले नाही. एकीकडे फुटबॉलमध्ये विजय मिळवल्यानंतर दुसरीकडे हॉकीत देखील जळगाव संघ विजयी ठरला. विजयानंतर पोलीस अधिक्षकांसह सर्व खेळाडूंनी जल्लोष केला.
३४ वी नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा पोलीस कवायत मैदानावर सुरू असून शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर रोजी दिवसभरात मैदानावर खो-खो, व्हॉलीबॉल, बास्केट बॉल, हॅण्डबॉल, स्विमिंग स्पर्धा पार पडल्या तर जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर कबड्डी, धावणे, लांब उडी, अडथळ्यांची शर्यत, उंच उडी, गोळा भेक, भाला भेक, मैदानी खेळ, भारोत्तलन पार पडले. विभागीय क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलीस परिक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण संघ सहभागी झाले आहेत.
खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी शुक्रवारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांनी परिवारासह हजेरी लावली. तसेच दिवसभरात पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, कृष्णांत पिंगळे, कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस गृह उपअधीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलीस वेलफेअर शाखेच्या रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, डॉ.विशाल जयस्वाल, महेश शर्मा, लिलाधर कानडे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, दत्तात्रय पोटे आदी उपस्थित होते. उद्या समारोप सोहळ्याला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर, नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह ५ जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी पहिल्या सत्रात मैदानी क्रीडा स्पर्धेत मैदानी खेळांमध्ये ५००० मीटर धावणे महिला प्रथम कीर्ती भिसे जळगाव, द्वितीय चंदा मुंडे, तृतीय शितल लोखंडे नाशिक शहर, फुटबॉल जळगाव विरुद्ध नाशिक शहर जळगाव विरुद्ध नाशिक शहर जळगाव विजयी, नाशिक ग्रामीण विरुद्ध नंदुरबार नाशिक ग्रामीण विजयी, हॉकी अंतिम सामना नाशिक शहर विरुद्ध जळगाव जळगाव विजयी ठरले. कबड्डी महिला जळगाव विरुद्ध नाशिक ग्रामीण, जळगाव विजयी पुरुष अहमदनगर विरुद्ध जळगाव विजयी, धुळे विरुद्ध नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीण विजयी, खो-खो महिला जळगाव विरुद्ध धुळे सामन्यात धुळे विजयी, नंदुरबार विरुद्ध नाशिक शहर सामन्यात नाशिक शहर विजयी, अहमदनगर विरुद्ध नाशिक ग्रामीण स्पर्धेत नाशिक ग्रामीण विजयी ठरले. पुरुष नाशिक शहर विरुद्ध नाशिक ग्रामीण स्पर्धेत नाशिक ग्रामीण विजयी, अहमदनगर विरुद्ध जळगाव सामन्यात अहमदनगर विजयी, धुळे विरुद्ध नंदुरबारमध्ये नंदुरबार विजयी झाले.
हँडबॉल पुरुष जळगाव विरुद्ध नाशिक शहर नाशिक शहर विजयी, अहमदनगर विरुद्ध नाशिक ग्रामीण नाशिक ग्रामीण विजयी, धुळे विरुद्ध नंदुरबार धुळे विजयी, हॉलीबॉल पुरुष धुळे विरुद्ध नाशिक ग्रामीण धुळे विजयी, नाशिक शहर विरुद्ध जळगाव नाशिक शहर विजयी, महिला नाशिक शहर विरुद्ध अहमदनगर नाशिक शहर विजय, धुळे विरुद्ध नाशिक ग्रामीण धुळे विजयी, बास्केटबॉल पुरुष धुळे विरुद्ध नाशिक ग्रामीण धुळे विजयी झाले. अथेलेटीक्स पंच म्हणून राजेंद्र जाधव, डॉ.विजय पाटील, प्रा.इकबाल बेग उस्मान बेग मिर्झा, प्रा.वसीम आफताब मिर्झा, डॉ.कांचन विसपुते, निलेश पाटील, सचिन महाजन , योगेश सोनवणे, प्रा.समीर घोडेस्वार, विजय रोकडे, नितीन पाटील, अच्युत काशीद, गिरीश पाटील, गिरीश महाजन यांनी भूमिका पार पाडली.