जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांच्या पॅनलचा दारूण पराभव झाला आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर संघातील मोहाडी ग्रामपंचायतीची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रिंगणात गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यांचे पॅनल होते. परंतू त्यांचे पॅनल राष्ट्रवादी पुरस्कृत होते. नऊ पैकी तीन सदस्य निवडून आले असून भाविनी पाटील यांचा विजय झाला आहे. तर सर्वाधिक जागा भाजप पुरस्कृत पॅनलच्या निवडूण आल्या आहेत. मोहाडी ग्रामपंचायतीवर भाविनी पाटील गेल्या पंचवार्षिकमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. यंदाच्या निंवडणुकीत त्यांच्याविरोधात प्रा. शरद पाटील यांचे पॅनल उभे होते.