जामनेर (प्रतिनिधी) कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळेगाव (ता. जामनेर) येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. अनिकेत जितेंद्र जोहरे (१३) आणि अभय भागवत कोळी (१७) अशी या मृत मुलांची नावे आहेत.
अनिकेत आणि अभय हे दोन्ही मुले शुक्रवारी सकाळी दोर घेऊन घराबाहेर पडली होती. सायंकाळपर्यंत मुले घरी परत न आल्याने त्यांच्या पालकांनी शोध घेण्यास सुरूवात केली. काही मुलांनी अनिकेत व अभय ज्या मार्गाने गेले त्याची माहिती दिली. त्याप्रमाणे ग्रामस्थांनी शोध घेतला त्यावेळी एका विहिरीत दोघांचे मृतदेह आढळले. रात्री पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती.