जामनेर (प्रतिनिधी) बसमधून उतरताना महिलेची सोन्याची मंगलपोत लांबवल्याची घटना दि.१३ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, साबेरा सांडू तडवी (वय ५८, पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) या दि.१३ मार्च रोजी मलकापुर ते जामनेर एसटी बसमधून प्रवास करत होत्या. जामनेर येथे एसटी बसस्थानकात खाली उतरत असतांना गर्दीचा फायदा अज्ञात चोरट्याने त्यांची ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत आणि काही कागदपत्र लांबवली. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोना राजु तायडे हे करीत आहेत.
















