जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी कार्यरत असणारा दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या सर्व कर्जदारांना मार्चअखेर कर्जभरणा करण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच बँक कर्ज भरण्यासाठी दि. २६ व २७ मार्च या सुट्टीच्या दिवशीदेखील बँकेच्या सर्व शाखा सुरु राहणार आहेत. तरी सर्व कर्जदार सभासदांनी आपल्याकडील कर्ज भरणा वेळेत करुन, बँकेस सहकार्य करावे, असे आवाहन जेडीसीसी बँकेमार्फत करण्यात आले आहे.