TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव दूध संघ प्रकरणी ‘जैसे थे’चा निर्णय ; प्रशासक की, संचालक मंडळ?, जाणून घ्या…हायकोर्टाचा निर्णय !

हायकोर्टाने प्रशासक मंडळावर ताशोरे ओढल्याचा खडसे यांचा दावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2022
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा सहकारी दूध संघ मर्यादीत संस्थेवर ‘जैसे थे’ असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे प्रशासक मंडळ की,संचालक मंडळ नेमका कुणाला दिलासा मिळाला?, याबाबत कोण काय म्हणतेय ते जाणून घेऊ या !

जिल्हा दूध संघाचा अलीकडेच प्रशासक मंडळाने ताबा घेतला. परंतू आधीच्या संचालक मंडळाने न्यायालयात गेले होते. या अनुषंगाने आज जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर दि. २८ जुलै २०२२ च्या प्रशासक नेमण्याच्या आदेशास आव्हान दिले होते. आज उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती मंगेश पाटील व मा. न्यायमुर्ती संदीप मारणे यांचे द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिका कर्त्यांच्या वतीने जेष्ट वकील व्ही. डी. होन यांनी प्रशासक नेमण्याचा आदेश हा राजकीय हेतुने प्रेरीत असुन प्रशासक नेमण्यासारखी कुठलीही परिस्थिती निर्माण झालेली नव्हती व नाही. तत्कालीन संचालक मंडळास प्रशासक नेमण्यापुर्वी कायद्याने नोटीस देणे आवश्यक होते, परंतु तशी कुठलीही नोटीस न देता दि. २८ जुलै २०२२ मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आदेशाने प्रशासक मंडळाची नेमणुक करण्यात आलेली आहे. ती संपुर्णतः बेकायदेशीर आहे, असा युक्तीवाद केला.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

यावर कोर्टाने ‘जैसे थे’ असा निर्णय दिला की, या निर्णयानुसार परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी लागणार आहे. त्यामुळे कुणी पदभार स्वीकारला असेल तरी परिस्थिती ‘जैसे थे’ राहील असे विधी तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच अगदी पदभार स्वीकारला असला तरी, प्रशासक मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्याचा निर्णय नाहीय, असा देखील अर्थ होत असल्याचे विधीतज्ञांचे म्हणणे आहे. आजच्या उच्च न्यायालयाती सुनावणी प्रसंगी अँड. रोहीणी खडसे-खेवलकर व डॉ. संजीव पाटील, तसेच नवनियुक्त प्रशासक मंडळातील अजय भोळे हे उच्च न्यायालयात उपस्थित होते.

कोर्टाने सरकारवर ताशोरे ओढले : खडसे

सहकार कायद्यानुसार हायकोर्टाने सरकारवर ताशोरे ओढले आहेत. तुम्ही एकाच दिवसात आदेश काढतात. पदभार स्वीकारतात, चौकशी समिती नेमतात. काही कायदा, कानून आहे की, नाही?, असेही कोर्टाने विचारले. त्यावर प्रशासक मंडळाच्या वकिलांनी आम्ही पदभार स्वीकारला असल्याचे कोर्टाला सांगितले. त्यावर सहकार कायद्यानुसार पदभार हा चेअरमन अर्थात संचालक मंडळालाकडून घ्यायचा असतो. त्यांनी हा पदभार नाही तर, पोलिसांमार्फत घ्यायचा असतो, असा कायदा म्हणतो. एमडीकडून पदभार घेतल्यामुळे हा पदभार बेकायदेशीर आहे. जे संचालक मंडळ निवडून आलेले आहे तेच काम करेल. निवडून आलेले मंडळ कारभार सांभाळेल. परंतू त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार असणार नाही, असेही कोर्टाने म्हटल्याचे खडसे यांनी ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना सांगितलेय. परंतू कोर्टाच्या आदेशात प्रशासक मंडळ आणि संचालक यांच्याशी निगडीत शब्दभ्रम असल्यामुळे कोर्टाच्या नेमका आदेश काय? याबाबत संभ्रम आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार २ ऑगस्ट २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, पंतप्रधानांकडून नव्या नावाची घोषणा

August 6, 2021

खळबळजनक : बोदवड नगरपंचायत समोर विनोद पाडर यांचा अंगावर पेट्रोल टाकत आत्मदहनाचा प्रयत्न !

November 2, 2022

बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी का उतरले रस्त्यावर? ; जाणून घ्या..संपूर्ण प्रकरण !

January 31, 2022

एरंडोल तालुक्यात अमोल पाटील यांचा तडाखेबाज प्रचार

November 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group