अमळनेर (प्रतिनिधी) येथील खा.शि. कार्यकारी मंडळाच्या दि. १० एप्रिल २०२१ रोजीच्या सभेत कार्याध्यक्षपदी जितेंद्र मोहनलाल जैन व कार्य उपाध्यक्षपदी कल्याण साहेबराव पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या सुरुवातीस संस्थेचे सेक्रेटरी प्रा.डॉ.ए.बी. जैन यांनी सर्व कार्यकारी मंडळाचे स्वागत केले. नवनिर्वाचित कार्याध्यक्षपदी जितेंद्र मोहनलाल जैन यांचे नाव प्रदीप अग्रवाल यांनी सूचित केले, त्यास डॉ. बी.एस. पाटील यांनी अनुमोदन दिले. तर कार्य उपाध्यक्षपदी कल्याण साहेबराव पाटील यांचे नाव नीरज अग्रवाल यांनी सूचित केले, त्यास डॉ. संदेश गुजराथी यांनी अनुमोदन दिले. तदनंतर नवनिर्वाचित कार्याध्यक्ष व कार्य उपाध्यक्ष यांचे नाव सर्वानुमते मंजूर करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे मावळते कार्याध्यक्ष योगेश मुंदडा, कार्योपाध्यक्ष नीरज अग्रवाल, हरी भिका वाणी, डॉ. बी.एस. पाटील, प्रदीप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी आदी उपस्थित होते.