मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited Latur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ अभियंता पदवीधर आणि शिकाऊ अभियंता डिप्लोमा या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.
या पदांसाठी भरती
शिकाऊ अभियंता पदवीधर
शिकाऊ अभियंता डिप्लोमा
एकूण जागा – २६
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
शिकाऊ अभियंता पदवीधर :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण हे २०१९ नंतर पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
शिकाऊ अभियंता डिप्लोमा :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं शिक्षण हे २०१९ नंतर पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे कमीतकमी 14 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे. तर यासाठी कोणतीही वयाची अट नसणार आहे.
इतका मिळणार Stipend
शिकाऊ अभियंता पदवीधर – ९०००/- रुपये प्रतिमहिना
शिकाऊ अभियंता डिप्लोमा – ८०००/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ फेब्रुवारी २०२२