मुंबई (वृत्तसंस्था) इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिसची पदांच्या एकूण ५७० जागांसाठी भरती करणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA IOCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार या पदांसाठी ही भरती (Indian Oil jobs in Maharashtra) असणार आहे. इच्छुक उमेदवार १५ जानेवारी २०२२ पासून ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात.
या पदांसाठी भरती
टेक्निकल अप्रेन्टिस
ट्रेड अप्रेन्टिस
एकूण जागा ५७०
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
टेक्निकल अप्रेन्टिस : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इंजिनिअरिंगच्या संबंधित शाखेतून डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. शिक्षणात खुल्या प्रवर्गातील आणि OBC उमेदवारांना ५० % aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांनी ४५% aggregate मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे. Mechanical, Electrical, Instrumentation, Civil, Electrical & Electronics आणि Electronics या शाखांमधील डिप्लोमा पूर्ण उमेदवारांना यासाठी अप्लाय करता येणार आहे.
ट्रेड अप्रेन्टिस : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित शाखेतून ITI शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून, महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच काही जागांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. शिक्षणात खुल्या प्रवर्गातील आणि OBC उमेदवारांना ५० % aggregate मार्क्स असणं आवश्यक आहे. तसंच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांनी ४५% aggregate मार्क्स मिळवले असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. तसंच मागासवर्गातील उमेदवारांसाठी वयात सूट देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२२