जळगाव (प्रतिनिधी) भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीतर्फे दरेकर यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना राष्ट्रवादीमधील महिलांच्या प्रवेशा बाबत वादग्रस्त वक्तव्य करत टीका केली होती. विधान परीषदेचे विरोधी पक्ष नेता भाजप यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे. अशाप्रकारे पक्षाचा तसेच महिलांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरेकर यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून जळगाव राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीतर्फे शिवाजी पुतळ्यासमोर दरेकरांच्या फोटोवर शाई फेकुन तसेच जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.