वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेतील जॉन्सन आणि जॉन्सनने अचानक काही काळासाठी कोविड-१९ च्या लसीच्या मानवी चाचण्या थांबवली आहे. शरीरावर दुष्परिणामामुळे स्वयंसेवक आजारी पडले. त्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्याचे जॉन्सन आणि जॉन्सनने सांगितले.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सने कोरोना लस स्वयंसेवकांच्या शरीरावर टोचली. मात्र, दुष्परिणाम दिसून आल्यानंतर ही लस चाचणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जॉन्सन अॅसण्ड जॉन्सननंही कोरोनावर लस निर्माण केली आहे. या लसीच्या मानवी चाचण्या सुरु होत्या, पण अचानक एक स्वयंसेवक आजारी पडल्याने कंपनीने कोरोना लसीवरील चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ही आमची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत, असं जॉन्सन अॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आले आहे. जॉन्सन आणि जॉन्सनने सांगितले की, कंपनी स्वयंसेवकांचा आजार समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच कंपनीच्या क्लिनिकल आणि सेफ्टी डॉक्टर यांच्या व्यतिरिक्त स्वतंत्र डेटा मॉनिटरींग बोर्ड मूल्यांकन करत आहे.