मुक्ताईनगर (प्रतिनिधी) पत्रकार, पोलीस पाटील तसेच ग्राम दक्षता समिती सदस्य यांना कोविड फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देऊन त्यांना तालुकास्तरावर स्वतंत्र लसीकरण सुविधा मिळावी, याबाबत खा. रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्राद्वारे मागणी केलेली आहे.
संपूर्ण भारतात ४५+ वयोगटातील तसेच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आलेली असून. सध्य परिस्थितीत कोरोनाची दुसरी लाट चालू असुन शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बध लावलेले असून सकाळी ११ नंतर लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत पत्रकार, पोलीस पाटील तसेच ग्रामीण स्तरावर ग्राम दक्षता समिती सदस्य हे कोविड योध्यांच्या खांद्याला खांदा लावून कोरोनाशी एकजुटीने लढाई देत असून, आपआपल्या परिने देश कोरोना मुक्त होणेसाठी आपले योगदान देत आहे.
संपूर्ण देशात पहिल्या टप्या अंतर्गत डॉक्टर, नर्स, पोलीस यांना कोरोना योद्धा म्हणून लसीकरणास प्रथम प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर ६०+, ४५+ तसेच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आता १८ वर्ष वया पेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण सुविधा सुरु झालेली असतांना, देशाची लोकसंख्या पाहतांना कोविड लसीचा तुटवडा निर्माण झलेला असून शासनामार्फत मोजकाच पुरवठा होत आहे. त्यामुळे कोविड योध्यांच्या प्रमाणे अतिमहत्वाची जबाबदारी पार पडणाऱ्या या पत्रकार, पोलीस पाटील तसेच ग्राम दक्षता समिती सदस्य यांना कोविड फ्रंटलाईन वर्कर म्हणून मान्यता देऊन त्यांना तालुकास्तरावर स्वतंत्र लसीकरण सुविधा मिळणे बाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना मागणी केलेली आहे.