भुसावळ (प्रतिनिधी) येथे पत्रकारिता करतांना पत्रकारांनी घटनेची सत्यता जाणून द्यावी तसेच पत्रकारांनी अभ्यासपूर्वक कायदा समजून व सामाजिक भान ठेवून वृत्तांकन करावे ज्यामुळे नक्कीच समाज मनावर चांगला परिणाम होऊन चांगला घटक व व ओघाने चांगली समाज निर्मती होईल, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विधी सेवा समितीतर्फे पॅन इंडिया अवरनेस ॲन्ड आऊटरिच हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत कायद्याचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्या अनुषंगाने भुसावळ पत्रकार संघ व महिला दक्षता समिती यांचा संयुक्तरित्या भुसावळ पंचायत समिती येथील सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे हे होते. प्रमुख मान्यवर म्हणून जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, पत्रकार संजयसिंग चव्हाण, वकिल संघ अध्यक्ष ऍडव्होकेट तुषार पाटील, ॲड. वैशाली चौधरी होत्या.
यावेळी आजची पत्रकारिता तसेच त्यासंदर्भातील कायदे व मार्गदर्शक तत्वे या विषयावर ॲड. तुषार पाटील यांनी मार्गदर्शन केले तर दक्षता समिती सभासदांना काम करतांना कोणत्या अडचणी कायद्याचा अधिक संबंध येतो. त्यासंदर्भात ऍडव्होकेट वैशाली चौधरीं यांनी मार्गदर्शन केले तर जेष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी , पत्रकार संजयसिंग चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक भुसावळ वकील संघ महिला प्रतिनिधी ॲड. जास्वंदी भंडारी यांनी केले.
यावेळी ॲड भंडारी यांनी पत्रकार व महिला विधी सेवा समितीतर्फे पॅन इंडिया अवरनेस ॲन्ड आऊटरिच हा उपक्रम राबविला जात आहे. याबद्दल माहीती दिली. आभार प्रदर्शन पत्रकार संघ अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी मानले. कार्यक्रमास पत्रकार संघ सचिव हबीब चव्हाण, सदस्य कलीम पायलेट, संजीव काशिव, राजेश तायडे, ॲड निलेश भंडारी, भारती म्हस्के, पत्रकार कु.उज्वला बागुल, निरंजना तायडेे, अंजुम खान, सुनंदा खरे, महिला दक्षता समिती सदस्य व यांचेसह विधी महाविद्यालय विद्यार्थी प्रतिमा अग्रवाल, सुजाता वाघुळदे, नेहा जावरे उपस्थित होते.