मुक्ताईनगर (प्रतिनिधी) एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर नोटीस डकवल्याची चर्चा जिल्ह्यात दुपारपासून सुरु होती. परंतू असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना दिली आहे.
भोसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यानंतर तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील अटक करण्यात आली आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना बुधवारी ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच फार्म हाऊसवर देखील जप्तीची नोटीस बजावण्यात आली, अशा अनेक अफवा सकाळपासून सुरु होत्या. परंतू असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली आहे.