जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील बिलवाडी येथे दलित चर्मकार समाजातील मतिमंद मुलीला न्याय मिळावा, अशी मागणीचे निवेदन चर्मकार समाजातर्फे पी आय स्वप्निल नाईक यांच्याकडे देण्यात आले.
बिलवाडी येथे दलीत चर्मकार समाजातील मतीमंद सोळा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन गर्भवती करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व पिडीत मुलीला व तिच्या परीवाराला योग्य न्याय मिळावा, यासाठी सांत्वन पर भेट घेतांना राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष समाजभुषण पांडुरंग बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष उत्तम मोरे, गोवर्धन जाधव, विठ्ठल ननावरे आदी पहुर तालुका जामनेर येथे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
त्यावेळी पी आय स्वप्निल नाईक यांना निवेदन देताना माहीती देतांना बिलवाडी येथील पिडीत मुलीच्या आई वडील समवेत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष समाजभुषण पांडुरंग, आण्णा बाविस्कर निपाणे व जिल्हा अध्यक्ष नानासो उत्तम मोरे , गोवर्धन जाधव विठ्ठल ननावरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पीडित मुलींना मिळावा शासनाकडून आर्थिक मदत मिळावी त्याचे कुटुंबीयांना पुनर्वसन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे. योग्य न्याय न मिळाल्यास चर्मकार समाजातर्फे तिरु आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.