जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांनी आपल्या पदाचा तीन वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ पूर्ण झाला होता. त्यामुळे इतर कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षा यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठविला आहे.
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी कल्पना शांताराम पाटील यांनी सुमारे तीन वर्षे काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी चर्चा होती. या अनुषंगाने त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे पाठविला आहे.
आपण गत तीन वर्षात महिला जिल्हाध्यक्षा पदावर काम करीत आहे. पक्ष सत्तेत नसतांना देखील उत्साहाने आंदोलने, मोर्चे काढले महिला संघटना बळकट करण्याचा प्रयत्न केला असून आता नवीन तरूण चेहऱ्याला वाव मिळावा म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सौ. कल्पना पाटील यांनी राजीनाम्याच्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, आता या पदावर कुणाची नियुक्ती होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.