जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते कल्पेश पवार (रा.किनगाव ता.यावल) यांची रावेर लोकसभा विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी आज नियुक्ती मुंबई येथे करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे विद्यार्थी सेनेचे संदीप, अखिल चित्रे उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा (रावेर लोकसभा) या पदावर कल्पेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमित ठाकरे यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे.
विद्यार्थी, पालक, शिक्षक तसंच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपल्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा समस्यांचा अभ्यास आणि प्रसंगी आंदोलनं करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज रहायलाच हवं. मला पूर्ण विश्वास आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना’ अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हीही झपाटून काम कराल, असेही अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.