पुणे (वृत्तसंस्था) काँग्रेसचे युवा नेते कन्हेय्या कुमार सध्या पुणे दोऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. याची सध्या चर्चा सुरू आहे. यावेळी त्यांना जय श्रीराम म्हटल्यावर राग का येतो? असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले, मला नथुरामचा राग येतो, प्रभू श्रीरामाचा नाही.
ते म्हणाले, मला कधीच या गोष्टीचा राग येत नाही. एकतर माझं नाव आहे कन्हैय्या, माझ्या वडिलांचं नाव आहे जयशंकर आणि मी कुठून येतो, तर मिथिला नगरीतून. मिथिला माता जानकीची जन्मभूमी आहे. मग मला का राग येईल? मला नथुरामचा राग येतो, प्रभू श्रीरामाचा नाही. स्वातंत्र्य भीक म्हणून कधीच मिळत नाही. स्वातंत्र्य बलिदानानंतर मिळतं, त्यागानंतर मिळतं, संघर्ष केल्यानंतर मिळतं. लोकांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग करुन स्वातंत्र्य मिळवलं आहे. भीक म्हणून पुरस्कार मिळू शकतो, स्वातंत्र्य नाही मिळत. म्हणून माझं एक आहे की मी अशा प्रकारच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. माझं माध्यमांना सांगणं आहे की तुम्हीही दुर्लक्ष करा”.