बीड (वृत्तसंस्था) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा या आज बीडमध्ये दाखल झाल्या होत्या. पण, त्यांच्या गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या होमग्राऊंडमध्ये अर्थात बीडमध्ये करुणा शर्मा यांनी एंट्री करून एकच धुरळा उडवून दिला. पण, आता परळी येथील वैजनाथ मंदिराच्या समोर दर्शनासाठी आल्यानंतर करुणा शर्मा यांची गाडी अडवून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला गेला होता. या नंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासनाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये पिस्तुल आढळून आली, यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
परळी शहरात करुणा शर्माच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मंदिराच्या समोर करुणा शर्मा यांना अडवले. यावेळी परळीतील महिला नेत्यांना जाब विचारला परिस्थिती तणाव निर्माण होता. हे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना मंदिराच्यासमोर रोड बाहेर काढून दिले. पुन्हा मुंडे समर्थक आणि त्यांची गाडी आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.















