जळगाव (प्रतिनिधी) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या निकाल दि. ०३ ऑगस्ट २०२१ रोजी लागला असून त्यात काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या वर्ष २०२०-२०२१ चा दहावीचा निकाल १००% लागला आहे.
सर्व ११६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात २४ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले असून विपुल योगेश वंजारी हा विद्यार्थि शाळेतून ९८.६ % टक्के गुण मिळवून प्रथम आला असून त्याला गणित व समाजशास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले, प्राची दिलीप बराटे ९७.६% टक्के मिळवून व्दितीय आली. असून गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले, वरूण नितीन मुथा ९६.८% टक्के मिळवून तृतीय आला असून, तीर्था मनोज भंगाळे ९६.८% टक्के मिळवून तृतीय क्रमांकावर आहे, स्नेहा योगेश पाटील ९६.६% टक्के मिळवून चौथा क्रमांकावर असून गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहे, वेणू पुष्पकुमार मुन्धरा ९६.६% चौथा क्रमांकवर आहे. वेदांत योगेश राणे याने ९६.२% टक्के मिळवून पाचवा क्रमांक मिळवला असून गणित व संस्कृत या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले आहे. गणित विषयात ९ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण तर संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण २ विद्यार्थ्यांना तर समाजशास्त्र विषयात एका विद्यार्थ्याला १०० पैकी १०० गुण प्राप्त झालेत.
शाळेची ही ११ वी बॅच असून आतापर्यंत दरवर्षी १००% निकालाची परंपरा कायम आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, शालेय समिती अध्यक्ष धनंजय जकातदार प्राचार्य अमितसिंह भाटीया सर्व व्यवस्थापन मंडळ व सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांनी कौतुक केले.