जालना (वृत्तसंस्था) लॉकडाऊनसाठी मानसिकता तयार ठेवा, तयारीसाठी पूर्ण वेळ मिळेल असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. जालना महाराष्ट्राला दररोज ६ लाख लसींची पूर्तता झाल्यावर राज्याचा वेग वाढवता येईल असेही ते म्हणाले.
राज्यात लॉकडाऊन आधी जनतेला पूर्व सूचना देणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जालन्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. आज अर्थमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. त्यावेळी लॉकडाऊनमधील येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान लॉकडाऊनची जनतेनं मानसिकता ठेवावी आणि लॉकडाऊन लावण्याआधी जनतेला पुरेसा वेळ आणि पूर्वसूचना देण्यात येईल अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. लसीं मिळत नाही याची आम्हाला खंत आहे असंही ते यावेळी म्हणाले. यापुढे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट तयार होणार असून त्यातूनच ऑक्सिजनची गरज भागवली जाईल असंही त्यांनी सांगितलं. १० वी आणि १२ वी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जीव वाचवण्यासाठी असे निंर्णय घ्यावे लागतात असं सांगत त्यांनी या निंर्णयाच स्वागत केलं.
लॉकडाऊन काळात गोरगरीब नागरीकांना मदत करण्यासाठी चर्चा झाली असून मुख्यमंत्री याबाबतीत अंतिम निंर्णय घेतील असंही टोपे यांनी सांगितलं.सध्या अनेक जिल्ह्यात बेडची कमतरता असून याबाबतीत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना बेडस,ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यापुढे कमतरता असल्याची सबब चालणार नाही असा इशाराही टोपे यांनी दिला.
जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी, अजित पवारांचा निर्णय
कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमिडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता, वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिले जाईल. तिथे गरजू रुग्णांनाच वापरले जाईल. जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील. ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईत पुढचे पंधरा दिवस महत्वाचे असून याकाळात रुग्णांना बेड, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन, रेमडिसिव्हीर आदी बाबी उपलब्ध करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करावी. या लढाईसाठी निधी आणि मनुष्यबळ कमी पडू दिलं जाणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.