जळगाव (प्रतिनिधी) आयुष्य हे अनमोल आहे. आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेणे हे आपल्या सर्वांचं प्रार्थमिक कर्तव्य आहे. निरोगी शरीर, निरोगी मन, निरोगी विचार यासाठी आपण प्रयत्न पूर्वक आपल्या आहारावर लक्ष दिले तर नक्कीच सर्वाना आयुष्याची शंभरी गाठायला अडचण येणार नाही,असे प्रतिपादन प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्ष रजनीताई सावकारे यांनी आज केले.
शहरातील ओम सिद्ध गुरु नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव जेष्ठ नागरिक संघ येथील सभासदांसाठी ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर भुसावळ या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नियमित आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रजनीताई सावकारे, सौ. वैशाली पाटील,मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ शेख , वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे संयोजक डॉ. नीतू पाटील, डॉ. तेजस सुराणा, डॉ. राहुल गवळी, अध्यक्ष प्रकाश पाटील ,सचिव सतीश जंगले आदी उपस्थित होते. पुढे ताई म्हणाले की वयानुसार आहारात बदल करायला सुरुवात करा. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर नियमित आरोग्य तपासणी करणे हे गरजेचे आहे. त्यामुळे असे आरोग्य शिबिर भरवणे ही काळाची गरज आहे. वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघासाठी ग्रामीण रुग्णालयाने राबवलेला या उपक्रम निश्चित कौतुकास्पद आहे.डॉ. आसिफ शेख यांनी आरोग्य तपासणी आणि जेष्ठ नागरीक यावर माहिती दिली.
यावेळी जेष्ठ नागरिक संघातील जवळपास 51 जेष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. यावेळी वैद्यकीय अधिकारी , डॉ तेजस कोटेचा , डॉ.विक्रांत सोनार, डॉ राहुल गवळी, सौ शोभा सोनावणे परीसेवीका, सौ प्रणिता पाथरवट अधिपरिचारिक आर.डी बाविस्कर औषध विभाग अधिकारी, मनोज डोंगरसिंग सावकारे क्ष किरण विभाग, अजीम शेख रक्त तपासणी विभाग, रुपेश शेळके कनिष्ठ लिपिक, चेतन भालेराव OPD नोंदणी विभाग, यांनी परिश्रम घेतले. वासुदेव जेष्ठ नागरीक संघाने ग्रामीण रुग्णालय येथील सर्व वैद्यकीय अधिकारी आणि सहकारी वर्गाचे आभार मानले.यावेळी सूत्रसंचालन सतीश जंगले तर आभार प्रदर्शन धनराज पाटील यांनी केले.
डॉ. नितु पाटील, यांनी मनोगत व्यक्त करतांना,
” एक दिन जीत ऐसी आयेगी तुम्हारे हिस्से,
दुनिया भूल जायेगी अपने हार के हर किस्से…!”
हा शेर म्हणत उपस्थित नागरीकांकडून वाहवाह मिळवली.















