जळगाव (प्रतिनिधी) एकनाथराव खडसेंच्या व्हायरल फोन संवादानंतर आज प्रथमच गिरीश महाजन यांनी खडसेंना चांगलंच सुनावलं आहे. यामध्ये एकनाथराव खडसे यांचा दोष नाही. वाढते वय, अनेक आजार यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
महाजन यांच्या जामनेर मतदार संघातील एका गावात पाणी येत नसल्याची तक्रार एका तरुणाने एकनाथराव खडसेंना फोन वर केली. फोन वरील संभाषणात खडसेंनी तुमचा आमदार मेला का, पोरींचेच फोन उचलतो, बायकांमागे फिरतो अशी टीका केली होती. ते संभाषण प्रचंड व्हायरल झाल्यानंतर महाजन यांनी खडसेंना उत्तर दिलं आहे.
एकनाथराव खडसेंना उच्च पदाची अपेक्षा असताना आमदारकी ही मिळाली नाही. वाढतं वय, आजारपण यामुळे बिचाऱ्या खडसेंचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. अशी खोचक टीका खडसेंवर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.