मुंबई (वृत्तसंस्था) सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्यपालांची भेट घेऊन भाजपातून एकनाथराव खडसे यांच्या राज्यपाल नियुक्त जागेसाठी विरोध केल्यामुळे खडसेंचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. दरम्यान, राजपाल नियुक्त १२ जागांसाठी एकनाथ खडसे यांचं नाव राष्ट्रवादीकडून पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सध्या आहे.
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का? याबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू आहे. मात्र अद्याप खडसेंचे नाव निश्चित झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन खडसेंच्या नावाला विरोध केला आहे. राज्यपाल नियुक्तीसाठी १२ नवे गेलेली आहेत, त्यातले एक नाव एकनाथ खडसे आहे अशा बातम्या येत आहेत. मात्र खडसेंच नाव येणं हे संतापजनक आहे. त्यांच्याविरोधात निवेदन देण्यासाठी अंजली दमानिया यांनी राज्यपालांची भेट घेतली. तसेच आजतागायत एकनाथ खडसेंच्या विधानावर पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही, त्यामुळे भविष्यात कोर्टाची लढाई लढावी लागणार आहे. तत्पूर्वी मी राज्यपालांकडे मी निवेदन दिले आहे. राज्यपालांना आणखी काही पुरावे देणार आहे असं अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.