जळगाव दि.2 (प्रतिनिधी) – जळगाव शहरात गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमानिमित्त आगमन होत आहे. देशात तसेच विदेशात मॉरिशस पासून वेगवेगळ्या शहरात दि. 28 जून ते 21 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.7 जुलै रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे सकाळी ९.०० ते १२ वाजे दरम्यान तुलसी परिवारातर्फे आचार्य किरीटभाईजी यांचे प्रत्यक्ष दर्शन व भव्य प्रवचन आयोजित केले आहे. या कार्यक्रमात किरीट भाईजींचे प्रत्यक्ष दर्शन व विद्वत्ता पूर्ण प्रवचनाचा लाभ सर्व महानुभाव यांना होणार आहे. ऋषिवरजींचे स्वागत, गुरुवंदना, गुरुपूजन, प्रवचन, ठाकूरजी पूजन, प्रश्नोत्तरी, दर्शन, प्रसादी इत्यादी कार्यक्रमांचा समावेश यात आहे. गेले 20-25 वर्षापासून गुरूजींच्या प्रवचनाची सुवर्ण संधी जळगाव वासियांना मिळत आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात संत किरीट भाईजी यांची जागतिक कीर्ती पसरली आहे. त्यांनी देश विदेशात श्रीमद्भागवत, शिवपुराण, राम कथा, हनुमान कथा इत्यादी अध्यात्मिक विषयांवर निरूपण करत असतात, अशा महान संतांचा लाभ भाविकांना होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती द्यावी … असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.