जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा येथून कीर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर बांभोरी (ता. धरणगाव) येथे बहिणीकडे जाण्यासाठी निघालेले कीर्तनकार कैलास प्रकाश कोळी (२२, रा. खर्डी, ता. चोपडा) यांना ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील कृष्णा लॉन्सजवळ घडली.
चोपडा तालुक्याील खर्डी येथे कैलास कोळी हे युवा किर्तनकार आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शनिवार २३ डिसेंबर रोजी त्यांचे पाचोरा येथे कीर्तनाचा कार्यक्रम असल्याने ते दुचाकीने किर्तनासाठी गेले होते. रात्री ११ वाजता कीर्तन संपल्यानंतर ते दुचाकीने जळगाव येथे येत असताना शहराजवळील शिरसोली रोडवरील कृष्णा लॉन समोर रात्री १२.३० वाजता गॅसच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात कीर्तनकार कैलास कोळी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबियांासह नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. त्यांनी कैलास कोळी यांचा मृतदेह बघताच मनहेलावणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहीण आणि असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भयावह दृश्य ; एक पाय शरीरापासून वेगळा !
हा अपघात इतका भीषण होता की कोळी यांचा एक पाय त्यांच्या शरीरापासून वेगळा झाला. कोळी हे ट्रकच्या चाकाखाली अडकलेले असताना ट्रकचालक घटनास्थळावरून पळाला. ट्रकमध्ये सिलिंडर असल्यामुळे तो मागे व पुढे होत नसल्याने तब्बल एक तास कोळी हे ट्रकच्या चाकाखाली अडकलेले होते.