बंगळुरु (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज एकाच टप्प्यात 224 जागांसाठीचं मतदान पार पडलं. तर येत्या 13 मे ला मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता विविध संस्थांच्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत असला तरी स्पष्ट बहुमतापासून थोडा लांब आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असूनही जेडीएस मात्र, किंग मेकरच्या भूमिकेत असणार असल्याचेही एक्झिट पोल सांगताय.
TV9 कन्नड-सी वोटरचा एक्झिट पोल
काँग्रेस – 100-112, भाजप – 83-95, जेडीएस- 21-29, इतर – 02-06
टीव्ही ९ चा पोल
टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात आल्यात. भाजपला ८८ ते ९८ जागा, काँग्रेसला ९९ चे १०९ जागा आणि जेडीएसच्या खात्यात २१-२६ जागा जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
झी आणि मॅट्रिझच्या एक्झिट पोल
काँग्रेसला १०३-११८ जागा, तर भाजपला ७९-९४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर एक्झिट पोलनुसार जेडीएसला २५-३३ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्यच्या खात्याता २ ते ५ जागा जाऊ शकतात.
रिपब्लिक टीव्ही आणि पी पार्कचा सर्वे
कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज असून सत्ताधारी भाजपला ८५-१००, काँग्रेसला ९४-१०८ आणि जेडीएसला २४-३२ जागा आणि अन्यच्या खात्याता २ ते ६ जागा जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
पोलस्ट्रॅट
भाजप – ८८ ते ९८ जागा, काँग्रेस – ९९ ते १०९ जागा, जेडीएस – २१ ते २६ जागा, इतर – ० ते ४ जागा
नवभारतचा एक्झिट पोल
नुसार कर्नाटकात काँग्रेसला आघाडी मिळू शकते. काँग्रेसला 106 ते 120, भाजपला 78 ते 92, जेडीएसला 20 ते 26 आणि इतरांना 2 ते 4 जागा मिळू शकतात.
टाईम्स नाऊचा एक्झिट पोल
कर्नाटकमध्ये काँग्रेसला 113 जागा मिळू शकतात. तर भाजपला 85, जेडीएसला 23 आणि इतरांना 3 जागा मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सचा एक्झिट पोल
काँग्रेसला 110 ते 120 जागा, भाजपला 80 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जेडीएसला 20 ते 24 जागा मिळू शकतात आणि इतरांना एक ते तीन जागा मिळू शकतात.
















