बोदवड (प्रतिनिधी) येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे लैंगिक तक्रार शोषण समिती व दिवाणी व फौजदारी न्यायालय बोदवड यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत न्यायाधीश व इतर वकिलांनी उत्स्फूर्तपणे संवाद साधला.
याप्रसंगी बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश क्यू.ए.एन. सरवरी यांनी कायदेविषयक मार्गदर्शन करताना दैनंदिन जीवनात जगतांना कायद्याचं ज्ञान ठेवून त्याचं पालन केले तर जीवन सुलभ होईल आणि आपल्यावर आरोपी होण्याची वेळ येणार नाही असे सांगीतले. सुमारे ४५००० प्रलंबित खटल्यांचा वेळेत निकाल लावणारे बोदवड न्यायालयाचे न्यायाधीश यांनी विदयार्थ्यांना मेहनत व वेळेचे महत्त्व पटवून दिले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल, सचिव विकास कोटेचा, ज्येष्ठ संचालक ॲड. प्रकाशचंदजी सुराणा, समन्वयक शैलेंद्र कुमार परसे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी, उपप्राचार्य विनोद चौधरी उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक ॲड. प्रकशचंद्र सुराणा यांनी यशस्वी होण्याचे गमक सांगतांना कायद्याचे महत्व उदाहरण देऊन सांगीतले. ॲड. धनराज प्रजापती यांनी विदयार्थ्यांना त्यांच्या गुणांची तसेच दोषांची जाणीव करून देत युवाशक्ती आणि तीची ताकत यांचे महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
त्यानंतर ॲड.इंगळे यांनी युवक हे देशाचे आधारस्तंभ आहेत हे सांगताना देशाच्या प्रगतीमध्ये युवकांचे आणि शासनाचे कर्तव्य नमूद केले. वकील महासंघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी संवाद कौशल्य विकसित करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगीतले. तसेच महाविद्यालयीन जीवनात अनेक या कार्यक्रमातला उत्स्फूर्त सहभाग आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देऊन जाते याचं मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधी समिती समितीचे समन्वयक शैलेंद्र कुमार परसे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. वंदना नंदवे व प्रा. वैशाली संसारे यांनी केले. प्रा .कंचन दमाडे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समिती अध्यक्ष डॉ. गीता पाटील सदस्य डॉ. रत्ना जवरास, श्रीमती कंचन दमाडे, प्रा. वैशाली संसारे, डॉ. मनोज निकाळजे, डॉ. वंदना नंदवे, अजित पाटील, शरद पाटील, कार्यालय अधीक्षक बाबुराव हिवराळे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.