अमळनेर प्रतिनिधी । आज संपूर्ण खान्देशात सर्वपित्री अमावस्या मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. माजी आमदार कृषिभूषण पाटील व त्यांच्या सौभाग्यवती अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कृषिभूषण जिजामाता पुष्पलता पाटील यांनी देखील यादिवशी आपल्या स्वर्गीय आप्तांच्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या त्यांच्या प्रगतीत त्यांच्या पूर्वजांचा आशीर्वाद नेहमीच त्यांच्या मागे असतो याचाच भाग म्हणून त्यांनी आज मनोभावे त्यांची पूजा केली.
हिंदू पंचांगाप्रमाणे दक्षिणी भारतात हा दिवस भाद्रपद महिन्याचा शेवटचा दिवस असतो, इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा दिवस सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येतो. या अमावास्येला ‘सर्वपित्री अमावस्या’ किंवा ‘पितृमोक्ष अमावस्या’ असेही म्हणतात. आपल्या पितरांची मृत्युतिथी नक्की माहीत नसेल,किंवा त्यांच्या काही अपेक्षा अपूर्ण असतील अशा आपल्या स्वर्गीय आप्तांसाठी सर्व लोक,या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. किंवा निदान, कावळ्यासाठी वाढलेल्या अन्नाचे ताट ठेवतात.