पाळधी ता. धरणगाव (शाहबाज देशपांडे) कुंभनगरी नाशिक ते संत नगरी शेगाव सायकलवारीने शेगावकडे प्रस्थान केले. आज दुसऱ्या दिवशी दुपारी पाळधी येथे जेवणाचा आस्वाद घेतला. कुंभनगरी नाशिक ते संत नगरी शेगाव सायकलवारीने शेगावकडे प्रस्थान केले. आज दुसऱ्या दिवशी दुपारी पाळधी येथे जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी जि. प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडून भाविकांचा स्वागत तथा सत्कार करण्यात आला.
पंढरपूर वारीच्या धर्तीवर शेगावलाही संत गजानन महाराजांवरील श्रद्धेपोटी वारी सुरू असून यात पर्यावरण संवर्धन, इंधन बचत असे संदेश देण्यात येतात. आरोग्याची गुरुकिल्लीही त्यातून मिळते. या वर्षी निघालेल्या सायकल वारीत नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर माने यांच्यासह 35 सायकल यात्रेकरू सहभागी झाले आहेत. नाशिक ते शेगाव हे अंतर ४५० किलोमीटरचे असून रोज ११० किलोमीटर याप्रमाणे चार दिवसांत ते शेगावला पोहचणार आहेत. आज दुसऱ्या दिवशी दुपारी पाळधी येथे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आणि बुलढाणा जिल्हा ना.गुलाबरावजी पाटील यांच्या फार्महाऊसवर जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. मंत्री महोदय पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्याकारणाने स्वागत जि.प सदस्य प्रतापराव पाटील यांनी केले.
जळगावचा खास मेनू शेवभाजी, वांग्याचे भरीत कळण्याची भाकर, पुऱ्या जेवण करून सायकलिस्ट बंधू तृप्त झाले. या वेळी उपस्थित मागासवर्गीय जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, आबा माळी, अनिल माळी, लखन पाटील, सचिन भोई, दिनेश कडोसे, आकाश पाटील, अक्षय पाटील, दानिश पठाण, प्रणय ननव्हरे, राहुल ठाकूर, गणेश तायडे,मच्छिद्र कोळी,गुलाब माळी, रफिक शेख, योगेश माळी, भूषण माळी, सुधाकर माळी, कल्पेश कोळी,गणेश कोळी, गोकुळ नन्नवरे हे उपस्थित होते.