नाशिक (वृत्तसंस्था) पाणी तपासणीचा अहवालाच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रयोगशाळेचा वरिष्ठ अणुजीव सहायकास एसीबीने बेड्या ठोकल्या. ही कारवाई जिल्हा रुग्णालय परिसरातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली. वैभव दिगंबर सादिगले ( वय ४८, रा. वक्रतुंड अपा. तिडके कॉलनी)असे संशयित लाचखोर वरिष्ठ अणुजीव सहायकाचे नाव आहे.
केटरिंग व्यावसायिकाने याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या भावाच्या नावाने नोंदणी असलेली आणि अन्य तीन संस्था अशा चार संस्थांच्या वतीने केटरिंग व्यवसायासाठी जे पाणी वापरले जाते त्याबाबतचे नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जमा करण्यात आले होते. या नमुन्यांचा अहवाल अनुकूल देण्यासाठी तक्रारदाराने संशयिताची भेट घेतली असता त्याने प्रती संस्था ५०० रुपये असे एकूण चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. बाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याने ही कारवाई करण्यात आली.
पथकाने सापळा लावून संशयित सादिगले यास त्याच्याच कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी व उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक त्याने प्रती संस्था ५०० रुपये अशी मीरा आदमाने, पोलीस नाईक प्रव चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी महाजन, नितीन कराड व प्रमोद केली होती. याबाबत तक्रारदाराने चव्हाणके आदींच्या पथकाने केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.