जळगाव (प्रतिनिधी) शहरातून एका वर्षासाठी हद्दपार असलेल्या महिला आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, स्थानिक गुन्हे शाखेच्या हद्दपार आदेश (ता. १३ ऑगस्ट २०२१) अन्वये कल्पना हिरामण जगताप (रा. शिवाजीनगर) या महिलेला जळगाव शहरातून १ वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र, या महिलेने पोलीसांची कोणतीही परवानगी न घेता जळगाव शहर रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास असल्याचे आढळून आली. रामानंदनगर पोलीसांनी माहिती मिळताच संशयित महिला कल्पनाबाईला ताब्यात घेत चौकशी केल्यावर हद्दपारीचे उल्लंघन केल्याचे समोर आले. तिच्याविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय निकुंभ हे करीत आहे.