जळगाव (प्रतिनिधी) बनावट अंगठी ठेवून हातचालाखी करीत सोन्याच्या अंगठ्या चोरणाऱ्या लकी शर्मा उर्फ लकी शिवशक्ती पाठक (वय ३८, रा. बरेली, उत्तरप्रदेश) या लेडी नॅचरच्या उत्तखदेशातील बरेली येथून जेरबंद केले. अंगठ्या चोरणारी ही लेडी नॅचर उच्चशिक्षीत आहे. तसेच जळगावातील आर. सी. बाफनाच्या सुवर्णपेढीतील अंगठ्यांचे टॅग चोरुन ते टंग तीने छत्रपती संभाजी नगर येथे चोरी करतांना वापरल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अंगठी खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात जावून हातचालाखी करीत एकाच दिवशी दीड तासात आर. सी. बाफना, भंगाळे ज्वेलर्स आणि पु. ना. गाडगीळ या नामांकीत सुवर्ण पेढ्यांमधून ४ लाख ७० हजार रुपयांच्या अंगठया चोरुन नेल्याची घटना दि. २७ ऑक्टोंबर रोजी घडली होती. याप्रकरणी जिल्हापेठ व शनिपेठ पोलीस ठाण्यात या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच चोरी करतांना ही महिला सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांकडून फुटेजच्या आधारावरुन लेडी स्क्रॅचरचा शोध घेतला जात होता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन ही महिला उत्तरप्रदेशातील बरेली येथील असल्याची माहिती शनिपेठ पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर मार्गदर्शनाखाली तपासधिकारी पोहेकों प्रदीप नन्नवरे, वैशाली पावरा आणि पोकों निलेश घुगे यांच्या पथकाने बरेली येथून ताब्यात घेतले. त्यांना नेत्रम विभागातील पोकों पंकज खडसे, मुबारक तडवी, कुंदनसिंग बयास तर तांत्रिक विश्लेषासाठी मिलींद जाधव, गौरव पाटल यांनी मदत केली.
जळगावनंतर दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजी नगर केले टार्गेट
युट्यूबवरील व्हिडीओ बघून उच्चशिक्षीत असलेल्या लकी शर्मा उर्फ लकी पाठक या लेडी मॅचरने अंगठ्या चोरण्यास सुरुवात केली. चोरी करतांना ती अंगठ्यांना लावलेले टॅग देखील चोरी करीत होती. जळगावातील आर. सी. बाफना ज्वेलर्समध्ये चोरी केल्यानंतर तीने अंगठ्यांना लावलेले टंग देखील चोरले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीने छत्रपती संभाजी नगर येथील आर. सी. बाफना यांच्याच सुवर्णपढीत चोरी करतांना बनावट अंगठीला चोरलेला टॅग वापरुन तेथून दोन अंगठ्या चोरुन नेल्या होत्या.
अखेर आधारकार्डमुळे झाली जेरबंद
नागपूर येथील खंडेलवाल आणि लोद ज्वेलर्स येथून या लेडी स्नॅचरने अंगठ्यांची चोरी केली. परंतू हा प्रकार दुकान मालकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या महिलेला पोलीस ठाण्यात आणले. परंतू त्या महिलेने चोरलेल्या अंगठ्या परत दिल्यामुळे सराफ व्यावसायीकांनी तक्रार न दिल्याने तिच्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल केला नव्हता. परंतू पोलिसांनी लकी शर्मा या महिलेचे आधारकार्ड घेवून त्याबाबतची नोंद करुन ठेवली होती. त्याच आधारकार्डमुळे लकी शर्मा हीचा शोध घेण्यास जळगाव पोलिसांना यश आले.
अनेक राज्यात केली चोरी दाखल मात्र तीन ठिकाणीच
उत्तरप्रदेशमधील लकी शर्मा या लेडी स्नॅचरने अनेक राज्यांमधील सुवर्ण पेढ्यांमधून अंगठ्या चोरलेल्या आहे. परंतू त्या पैकी केवळ हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रातील जळगाव व छत्रपती संभाजी नगर येथेच गुन्हे दाखल आहे. या लेडी नॅचरकडून जळगावातील तीन आणि छत्रपती संभाजी नगरातून चोरलेल्या ६१.६७ ग्रॅम वजनाच्या ६ लाख ६० हजार रुपये किंमतीच्या ६ अंगठ्या जप्त केल्या आहे. चोरलेल्या अंगठ्या ती गरजेनुसार विकत असल्याची माहिती देखील पोलिस तपासात समोर आली आहे.















