जळगाव (प्रतिनिधी) मुंबई येथील मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या प्रतिथयश संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासम्मेलन -२०२२ च्या आयोजनानिमित्तने राज्यस्तरीय आदर्श सांस्कृतिक संस्था सेवारत्न पुरस्कार – २०२२ ह्या पुरस्काराने प्रतिष्ठानास गौरविण्यात आले.
हा पुरस्कार समारंभ पुणे येथे श्री उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ येथे नुकताच संपन्न झाला. सन्मानचिन्ह, मानपत्र, गौरवपदक, महावस्त्र, मानाचा फेटा व मानाचा बॅच असे पुरस्काराचे स्वरूप होते. हा मानाचा पुरस्कार राज्यस्तरीय असून त्यासाठी स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाची निवड होणे हि जळगावसह खान्देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
ह्या पुरस्काराचे वितरण प्रकाश सावंत (महापरिषद समन्वयक), मनीषा कदम (पुरस्कार समारंभाध्यक्षा), अमोल सुपेकर (अध्यक्ष), एल.एस.दाते (कार्याध्यक्ष, पुरस्कार समिती), यांच्या उपस्थितीत व सुप्रसिद्ध कीर्तनकार व तत्वचिंतक ह.भ.प. श्यामसुंदर आळंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. प्रतिष्ठानच्या वतीने हा पुरस्कार कार्यकारी समिती सदस्य निनाद चांदोरकर यांनी स्वीकारला.