पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील हुतात्मा स्मारकात दिवसभर पावसाची रिपरिप असतांना आधुनिक भारताचे जनक स्व. राजीव गांधी यांना येथील कॉंग्रेसकडुन भरपावसात आदरांजली वाहण्यात आली.
आधुनिक भारताचे जनक स्व. राजीव गांधी यांच्य जयंतीनिमित्त पाचोरा काँग्रेसने आदरांजलीचा कार्यक्रम जाहीर केला असता नियोजित कार्यक्रमा आधीच पावसाची रिपरिप सुरू झाली ती काही संपत नव्हती. अशातच कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा स्मारकात स्व. राजीव गांधी यांना आदरांजली देऊन त्यांचे भारताला आधुनिक तंत्रज्ञान देण्याच्या त्यागाची उजळणी करण्यात येऊन आज भारतात जो संगणक दिला तो फक्त स्व. राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून. यावेळी कार्यक्रमाला शहर अध्यक्ष अॅड. अमजद पठाण, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष कल्पेश येवले, संदीप पाटील, मुसेब बागवान, जावेद बागवान, फरजान बागवान, अॅड. वसीम बागवान अनिल मोची, संतोष काटकर, दादु वारळे, शाम ढवळे, गजानन पाटील आदी उपस्थित होते.