अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर येथील मंगल ग्रह सेवा संस्थेच्या कर्मचाऱ्याचा वारसांना एक लाख विमा रकमेचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या हाताने सुपूर्द करण्यात आला. महाले यांच्या या संकल्पनेमुळे व दूरदृष्टीने केलेल्या विचारामुळे आज या कुटुंबातील मयत प्रवीण पाटील यांच्या पत्नीला मुलांच्या भविष्यासाठी ह्या मिळालेल्या रकमेची नक्कीच मदत होत आहे.
मनुष्य गेल्यानंतर त्याची उणीव त्याच्या कुटुंबाला नेहमी भासत असते विशेषतः त्या वेळी जेव्हा तो कुटुंबप्रमुख असतो. अन त्याच वेळी जर दुर्दैवाने काळाने घात घातला आणि आपल्यातल्या माणसाला हिरावून घेतले तर हे दुःख न पेलवण्यासारखे असते मात्र अशा वेळी जर एखाद्या विमा पॉलिसीचा कव्हरेज असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक आधार मिळत असतो. दूरदृष्टीचा विचार करून मागील वर्षी मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष महाले यांच्या संकल्पनेतून संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्यात आला. आणि ही संकल्पना राबवून काही महिने झाले नाही तोवर संस्थेतील कर्मचारी प्रवीण शालीग्राम पाटील यांचे अवघ्या ३८ व्या वर्षी ऐन उमेदीच्या व जबाबदारीच्या काळात मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला. मात्र अशा वेळी महाले यांच्या या संकल्पनेमुळे व दूरदृष्टीने केलेल्या विचारामुळे आज या कुटुंबातील मयत प्रवीण पाटील यांच्या पत्नीला मुलांच्या भविष्यासाठी ह्या मिळालेल्या रकमेची नक्कीच मदत होत आहे.
यावेळी संस्थेचे सचिव बाविस्कर, संचालक मंडळ, एल आय सी चे विकास अधिकारी नितीन पाटील, विमा प्रतिनिधी सचिन चव्हाण आणि संस्थेतील सेवेकरी वर्ग आदी उपस्थित होते.