धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी खुर्द येथे ‘हर घर दस्तक’ कोविड लसीकरणची सुरुवात आज देशपांडे वाड्यांमधून करण्यात आली.
यावेळी आर एस धनगर आरोग्य सेवक दोनगाव, शोभा राजेंद्र सोनवणे L H V, (नांदेड) , भारती राजेंद्र चौधरी, आशा वर्कर, जयश्री प्रसाद दहिवदकर, आरोग्य सेविका, सुनंदा अर्जुन पाटील, आरोग्य सेविका, या सर्व टीमने घरघर जाऊन लोकांना लसीकरण केले. हर घर दस्तक मोहीम अंतर्गत पाळधी खुर्द मध्ये एकूण १२० लोकांची लसीकरण झाले,
यावेळी नईम गणि देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते, आरिफ रफिक देशपांडे, ग्रामपंचायत सदस्य, समीर शकील बागवान यांच्या सहकार्याने लसीकरण मोहीम ला. १००/ परसेंट प्रतिसाद मिळाला.