TheClearNews.Com
Saturday, February 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मासिक पाळी जनजागृती कार्यक्रम प्रकल्पाचा शुभारंभ ; प्रोजेक्ट बाला व निर्णय फाऊंडेशन यांचा पुढाकार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 30, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेत ६ वी ते १२ वी च्या किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळी बाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने प्रोजेक्ट बालाच्या सहकार्याने निर्णय फाउंडेशन मार्फत मासिक पाळी जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ नुकताच सातपुडा विकास मंडळ पाल संचलित अनुदानित आश्रमशाळा लोहारा ता रावेर येथे नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर तसेच रावेरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी तायडे यांच्या हस्ते करण्यात आला. अरुण पवार, प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यक्रमास मुख्याध्यापक सुधाकर झोपे, सुनील सपकाळे तसेच शिक्षक वर्गाचे सहकार्य लाभले. प्रोजेक्ट बालाच्या अंमलबजावणी प्रमुख (Implementation Lead) कोमल ससाणे यांनी किशोरवयीन मुलींना मागर्दर्शन केले. मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील एक मुलभूत घटक आहे आणि यासाठी योग्य माहितीची आवश्यकता आहे. महिलांच्या व किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी सामाजिक कार्यात अग्रगण्य असलेली संस्था प्रोजेक्ट आणि निर्णय फाउंडेशन यांच्या माध्यमातून योग्य माहिती देऊन महिला व मुलींना याचे व्यवस्थापन करणे सोपे होईल असे सांगितले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

मासिक पाळी हि नैसर्गिक प्रक्रिया आहे. याबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. मासिक पाळीच्या काळात चुकीचा पद्धतीचा अवलंब केल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तसेच किशोरवयीन मुली शाळाबाह्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जळगाव जिल्ह्यातील आश्रमशाळेतील मुलींना याबाबत योग्य आरोग्य शिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करुंन देण्यासाठी प्रोजेक्ट बाला यांच्या सहकार्याने निर्णय फाउंडेशनने सर्वसमावेशक उपक्रम तयार करून मासिक पाळी या विषयातील गैरसमज आणि अडथळे दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पात मुख्य उद्दिष्ट मासिक पाळी बद्दल शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तसेच समुदायामध्ये वैज्ञानिक माहिती पोहोचवून मुली आणि महिलांना सक्षम करण्यात येणार आहे. तसेच चर्चासत्र आयोजित करून विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून त्यांच्या पुरुत्पादक आरोग्य विषयी परिपूर्ण माहिती दिली जाईल. या माहितीचा उपयोग त्यांचे सशक्तीकरण व त्यांच्या आरोग्याविषयी निर्णय घेण्यास मदत होईल.

मासिक पाळीच्या दरम्यान वापरण्यात येणारे प्रोडक्ट मिळवतांना अनेक अडचणी येतात. महिला व किशोरवयीन मुलींना प्रोडक्ट न मिळाल्याने बहुतांश वेळा अस्वच्छ आणि धोकादायक प्रोडक्टचा वापर करावा लागतो त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्या अडचणी ओळखून मासिक पाळीचे सन्मानाने व सुरक्षित व्यवस्थापन करता यावे यासाठी प्रोजेक्ट बाला यांच्या सहकार्याने निर्णय फाउंडेशन मार्फत किशोरवयीन मुली आणि महिलांना सुरक्षित आणि परवडणारी व पुन्हा पुन्हा वापरात येणारे कापडी पॅडचे वितरण करण्यात येणार आहे.

प्रोजेक्ट बालाच्या सहकार्याने निर्णय फाउंडेशन जळगाव जिल्ह्यात किशोरवयीन मुली व महिलांमध्ये मासिक पाळी विषयी जनजागृतीसाठी काम करत आहे. यामध्ये मासिक पाळी बद्दलचे मौन तोडून योग्य वैज्ञानिक माहिती पोहोचवून महिला व मुलींना सक्षम करण्यात येणार आहे. – संगीता बालोडे सह संस्थापक, निर्णय फाउंडेशन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 फेब्रुवारी 2026 !

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
Next Post

डॉक्टरला मारहाण प्रकरण : महिला पोलीस कर्मचारी निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डॉ. नितु पाटील विद्यापीठात प्रथम

September 6, 2022

शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना उभारी देणारा अर्थसंकल्प : आ. गिरीश महाजन

February 1, 2022

सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशात ओबीसी ४४.४ टक्के !

September 30, 2021

जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जळगाव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे !

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group