साकळी यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील मोहराळा ग्रामपंचायत अंतर्गत परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शासनाच्यावतीने मंजुर झालेल्या विविध विकास कामांचे शुभारंभ करण्यात आले.
दरम्यान मोहराळा ग्रामपंचायत अंतर्गत शासनाच्या वतीने मिळालेल्या सुमारे १० लाख रुपये निधी खर्चाच्या विकास कामांचे शुभारंभ जिल्हा परिषदच्या सदस्या सौ. सविता अतुल भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी लुकमान तडवी, ग्रामसेवक राजु तडवी, ग्राम पंचायतचे माजी उपसरपंच गजानन महाजन, विकी पाटील, शामा चौधरी, अनिल अडकमोल, अजय अडकमोल, विक्की अडकमोल, उर्खड्ड तडवी यांच्यासह ग्राम पंचायत कर्मचारी संजय पाटील, चंद्रकांत अडकमोल व बाळु भाऊ आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मोहराळा ग्रामपंचायतच्या वतीने सुमारे १० लाख रुपये खर्चाचे दलित वस्तीमध्ये ट्रीमिक्स काँक्रीटीकरणाचा रस्ता, बंदिस्त गटार तसेच महीला शौचालयांची कामे करण्यात येणार आहेत.