जळगाव (प्रतिनिधी) शहरातील काही घटनांबाबत जळगाव जिल्हा एकता संघटनेने माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन सादर केले की कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी यांनी सुव्यवस्था राखण्यासाठी कामे करताना निपक्षतेने आणि पारदर्शकतेने कामे केली पाहिजे. हिंसाचाराला कारणीभूत असलेली चिथावणी लक्षात घेतली पाहिजे, इतिहासाची हत्या बनवून वारंवार अशांतता पसरवण्याचा आणि जातीय मतभेदांना खत पाणी घालण्याचे प्रयत्न केले जात आहेत ते अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांनी चोख पावले उचलावी अशी विनंती संघटनेने केलेली आहे.
संबंधितांवर कडक कारवाईची मागणी
जळगाव शहरात नुकत्याच एका प्रार्थनास्थळावर तलवार घेऊन प्रार्थनासळातील साहित्याचे नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्याला विरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी त्या आरोपीचे हिस्टरी सीट काढून पोलीस अधीक्षकांना सादर केले व त्या आरोपीवर यूएपीए अथवा मकोकाप्रमाणे कारवाई करण्याची विनंती केली.
दुसऱ्या प्रकरणात कायद्याचा पदवीधर व गोरक्षक असून सुद्धा एका गरीब शेतकऱ्याचे गाई चोरून त्या गरीब शेतकऱ्याला आपल्या उदरनिर्वाह पासून रोखले असताना सुद्धा पोलिसांनी आवश्यक ती कारवाई न केल्याने समाज मनात समाज माध्यमाद्वारे पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने त्याबाबत पोलीस अधीक्षकांनी त्वरित आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
दोन्ही मागण्याबाबत कारवाई करणार
पोलीस अधीक्षकांना सादर केलेले कागदपत्र, व्हिडिओ, पुरावे यावरून निश्चितच आपणास न्याय मिळेल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांनी शिष्टमंडळाला दिले.
शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
फिर्यादी सलीम घासी खान, दुसरा तक्रारीतील फिर्यादी रईस पिंजारी सह सलीम खान, वहाब खान ,समशेर खान, समीर खाटीक, समीर खान, बशीर पिंजारी , मेहमूद पिंजारी, अख्तर पिंजारी. एकता संघटनेचे सर्व श्री हाफिज रहीम पटेल,फारुक शेख, नदीम मलिक, सय्यद चांद, आरिफ देशमुख, मौलाना रहीम पटेल, अनिस शहा, अन्वर खान आदींची उपस्थिती होती.