मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान २ ऑक्टोबरपासून क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असून अजूनपर्यंत त्याला जामीन मिळाला नाही. या प्रकरणाची चर्चा भारतातच नाही तर इतर देशांमध्येही सुरू आहे. आता पाकिस्तानच्या लोकप्रिय अँकरने शाहरुखच्या समर्थनार्थ ट्वीट करून शाहरुखला भारत सोडून पाकिस्तानमध्ये राहायला ये, असा सल्ला दिला आहे.
पाकिस्तानचे सर्व सेलिब्रेटी, अभिनेते आर्यन खान प्रकरणी शाहरुख खानचे समर्थन करत आहेत. आता पाकिस्तानचा प्रसिद्ध अँकर वकार जाकाने शाहरुखच्या समर्थनाथ ट्विट केले आहे. ”शाहरुख खान सर, तुम्ही भारत सोडा आणि तुमच्या कुटुंबासोबत पाकिस्तानात येऊन स्थिरस्थावर व्हा. नरेंद्र मोदी सरकार तुमच्या कुटुंबासोबत जे करत आहे, ते एकदम चुकीचे आहे. मी शाहरुख खानसोबत उभा आहे.” या ट्विटनंतर वकार ट्रोलदेखील झाला.
वकारच्या या ट्विटवरून काही लोक समर्थन करत आहेत. तर काही त्याची खिल्ली उडवत आहेत. एका युजरने म्हटले की, शाहरुखची पत्नी हिंदू आहे आणि ते हिंदुंचे सण देखील साजरे करतात. जो व्यक्ती पत्नीच्या धर्माचा देखील सन्मान करतो तो एक खरा माणूस आहे. तर काही युजरनी वकारला पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीच्या बेकार परिस्थितीची जाणीव करून दिली.